गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर २०२५ मध्ये जीवरक्षकांनी ५४८ पर्यटकांना बुडताना वाचवले

४५० भारतीय तर ९८ परदेशी नागरिकांचा समावेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14th February, 02:54 pm
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर २०२५ मध्ये जीवरक्षकांनी ५४८ पर्यटकांना बुडताना वाचवले

पणजी : गोव्यातील (Goa) समुद्रकिनाऱ्यांवर (Beaches) २०२५ मध्ये ५४८ पर्यटकांना (Tourist) बुडताना वाचवण्यात आले.  त्यात ४५० भारतीय (Indian) तर ९८ परदेशी (Foreign) नागरिकांचा समावेश आहे. ८२९ पर्यटकांना मदत केली. त्यात प्रथमोपचार पुरवणे, हरवलेल्यांना शोधून काढणे व इतर आपत्कालीन स्थितींचा समावेश आहे. 

आंतरराष्ट्रीय नकाशावर एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या गोव्यात देशीविदेशी पर्यटकांचा ओघ सुरू असतो. गोव्यात आल्यावर समुद्रकिनाऱ्यांवरील खळाळत्या लाटा, रुपेरी वाळू,  मनमोहक सू्र्योदय, सूर्यास्त पाहून पर्यटक स्वत:ला विसरतात. त्यांना समुद्रात उतरून खळाखत्या लाटांशी खेळण्याचा मोह आवरत नाही. त्यात काहीजण लाटांच्या प्रवाहांबरोबर वाहून जाऊ लागतात.

गोवा सरकारतर्फे समुद्रकिनाऱ्यांवर तैनात करण्यात आलेले जीवरक्षक समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवतात.  २०२५ मध्ये समुद्रात बुडणाऱ्या ५४८ पर्यटकांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले.  उत्तर गोव्यातील कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर १०३, बागा (६८), सिकेरी (६१). दक्षिण गोव्यातील कोलवा (५५) तर पाळोळेतील (५०) पर्यटकांचा यात समावेश आहे. बुडताना वाचवण्यात आलेल्या परदेशी पर्यटकांपैकी ५६ रशियन तर १३ युकेच्या पर्यटकांचा समावेश आहे. ऑक्टोबरमध्ये ६७ तर डिसेंबर महिन्यात सर्वात जास्त पर्यटकांना बुडताना वाचवण्यात आले. 

हेही वाचा