कुंकळ्ळीत सुरू होणार आणखी एक फिश मील प्रकल्प

प्रतिनिधी। गोवन वार्ता

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
56 mins ago
कुंकळ्ळीत सुरू होणार आणखी एक फिश मील प्रकल्प

पणजी : प्रदूषणामुळे फिश मील प्रकल्पांना विरोध होत असतानाही, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत आणखी एक मासळी प्रक्रिया प्रकल्प (फिश मील प्लांट) सुरू करण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवाना दिला आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी फिश मील प्रकल्पांपासून होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा अनेकदा सभागृहात उपस्थित केला होता.

माशांची वाहतूक इन्सुलेटेड वाहनांतून करण्यासह दूषित पाण्यावर स्वतंत्र ईटीपीमध्ये (ETP) प्रक्रिया करणे आणि प्रदूषणाचे ऑनलाइन यंत्रणेद्वारे मोजमाप करणे, अशा अटींवर हा परवाना देण्यात आला आहे.

मेसर्स गोवा मरीन इंपेक्स प्रायव्हेट लिमिटेडने गेल्या वर्षी मंडळाकडे ‘कन्सेंट टू ऑपरेट’साठी (Consent to Operate) अर्ज केला होता. कुंकळ्ळी पालिकेनेही या फिश मील प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर मंडळाने अर्जाचा विचार केला नसल्याने कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा अर्ज विचारात घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीने कागदपत्रे तसेच उपाययोजनांची पाहणी करून अहवाल सादर केल्यानंतर, ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवाना देण्यास मंडळाने मान्यता दिली आहे.

हेही वाचा