ऑनलाईन ‘मॅट्र‌िमोनियल’ फसवणुकीत अडकून महिलेने गमावले १.३९ लाख

जुने गोवे पोलिसांनी नोंदवला अज्ञातांविरुद्ध गुन्हा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
ऑनलाईन ‘मॅट्र‌िमोनियल’ फसवणुकीत अडकून महिलेने गमावले १.३९ लाख

पणजी : ऑनलाईन (Online) ‘मॅट्रिमोनियल’ (Matrimonial) फसवणुकीच्या (Fraud) जाळ्यात अडकून इंदिरा नगर, चिंबल येथील एका युवतीने १.३९ लाख रुपये महिलेने गमावले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जुने गोवे पोलीस स्थानकात (Old Goa Police Station)  तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

ऑनलाईन ‘मॅट्रिमोनियल’ साईटवरून युवती एका युवकाच्या संपर्कात आली. त्यातूनच ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात अडकली. संपर्कात आलेल्या युवकाने किंमती साहित्य असलेले पार्सल पाठवत असल्याचे तिला सांगितले. त्यानंतर तिला फोन यायला लागले व कॉरियर एजंट व कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगून पार्सल पाठवण्यासाठी पैसे पाठवण्यास सांगू लागले.

त्यानंतर युवतीने युपीआयद्वारे रक्कम पाठवली व पार्सलची वाट पाहू लागली. मात्र, शेवटपर्यंत पार्सल आले नाही व फोन केलेल्यांचे मोबाईलही बंद मिळू लागले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रार नोंदवली. युवतीच्या तक्रारीवरून जुने गोवे पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू केला आहे.

ऑनलाईन व्यवहार करताना सतर्कता बाळगावी

दरम्यान, अज्ञातांकडे ऑनलाईन व्यवहार करताना सतर्कता बाळगावी व खात्री न होता पैसे पाठवू नयेत. नाहक ऑनलाईन व्यवहाराच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकून हातचे गमावून बसू नये; असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

हेही वाचा