भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे गोव्यात जंगी स्वागत

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, नेते कार्यकर्त्यांकडून स्वागत; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे गोव्यात जंगी स्वागत

पणजी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP National President)  बनल्यानंतर पहिल्यांदाच गोव्यात येणारे नितीन नबीन (Nitin Nabin)  यांचे गोव्यात (Goa)  भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री (Chief Minister)  डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासहीत मंत्री, आमदार, नेते, कार्यकर्ते यांनी पणजी येथील भाजप मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मोठा फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. 


सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन मोपा विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे  स्वागत केले. त्यानंतर तेथून पणजी येथील भाजपच्या मुख्यालयात आले.


यावेळी मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते जमले होते. कार्यकर्त्यांनी घोषणा देत त्यांचे स्वागत केले. भाजप मुख्यालयाजवळ भाजपचा झेंडा फडकावल्यानंतर त्यांनी वाहनावरून कार्यकर्त्यांना संबोधित करताना शुभेच्छा दिल्या. 

हेही वाचा