
पणजी : सांगे (Sanguem) येथील प्रस्तावित बंधारा प्रकल्पाला (Proposed Bhandara Project) मिराबाग येथील स्थानिकांनी विरोध केला आहे.
मिराबाग परिसरात हा प्रकल्प साकारल्यास येथील बराच भाग पाण्याखाली जाण्याची भीती स्थानिकांना आहे. त्यामुळे स्थानिक या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पुन्हा एकदा एकवटले आहेत. बंधारा साकारल्यास झुवारी नदीचे पाणी या परिसरात घुसणार व त्यामुळे परिसर पाण्याखाली जाणार अशी भीती स्थानिक व्यक्त करीत आहेत. येथील घरे, ‘राखणदेव’ मंदिर, शाळा इत्यादी झुवारी नदीच्या भरतीच्या वेळी व पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. या प्रकल्पाला आमचा विरोध असून, प्रकल्प रद्द करीपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.