दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्तीचे

विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट


16 mins ago
दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्तीचे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे. याविषयीचे परिपत्रक वाहतूक खात्याने जारी केले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
राज्यात दरवर्षी सरासरी १०० जणांचा अपघातात मृत्यू होतो. दुचाकी अपघातात मृत्यू व गंभीर जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट घालणे सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी किती वेळ लागणार, असा प्रश्न आमदार कार्लुस फेरेरा यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, बाहेरच्या राज्यांतील लोक बेदरकारपणे वाहने चालवतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बॉडी कॅमेरे असलेले पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक गस्त घालत आहेत. दुचाकीवर दोघांनीही हेल्मेट घालण्याबाबतचे परिपत्रक वाहतूक खात्याने जारी केले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.