मच्छीमारांना रोजगाराची बळकटी देणारा 'ॲक्वा गोवा फिश फेस्टिव्हल' : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
09th January, 04:10 pm
मच्छीमारांना रोजगाराची बळकटी देणारा 'ॲक्वा गोवा फिश फेस्टिव्हल' : मुख्यमंत्री

पणजी : मासळीच्या (Fish) उत्पन्नात वाढ करणे, प्रक्रिया युनिट आणि कोल्ड चेन सारख्या सुविधांची कमतरता भरून काढणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या (Modern Technology) माध्यमातून मच्छीमारांच्या रोजगार संधींना बळकटी देणे; हे  'ॲक्वा गोवा फिश फेस्टिव्हल'चा (Aqua Goa Fish Festival)  हेतू आहे. मच्छीमारी व्यवसायाला पाठिंबा देऊन आम्ही गोव्याची (Goa) सांस्कृतीक ओळख जपून , असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सांगितले. 

पणजी शुक्रवारी एक्वा गोवा मासळी महोत्सवाच्या निमित्ताने विशेष परिसंवादाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी मत्स्योद्योगमंत्री निळकंठ हळर्णकर, सचिव प्रसन्न आचार्य आणि इतर पाहुणे उपस्थित होते. 

तीन दिवसांच्या एक्वा गोवा मासळी महोत्सवात गोमंतकीयांना सहभागी होऊन या दिवसांत वेगवेगळ्या प्रकारची मासळी खाण्यास व पाहण्यास मिळणार; असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या निमित्ताने घडवून आणलेले राष्ट्रीय परिसंवाद धोरण निर्माते, वैज्ञानिक, संशोधक, उद्योग भागधारक आणि समुदाय प्रतिनिधींना एका व्यासपीठावर आणून मच्छीमार क्षेत्र आणि सरकारी आराखड्याला बळकटी देण्यासहीत समुद्री पर्यावरण यंत्रणेत जैवविविधतेच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्याचे ध्येय ठेवले आहे. जेव्हा आम्ही मासळी क्षेत्राला पांठिबा देतो तेव्हा आम्ही या क्षेत्रावर विसंबून असलेल्या कुटुंबांना पाठिंबा देवून गोव्याची सांस्कृतीक ओळख जपून ठेवतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

मासळी आणि मासळी व्यवसाय गोव्याच्या ह्रदयाच्या जवळ आहे. गोव्यात मासळी म्हणजे नेहमीचे जीवन, सवय आणि नातेवाईकांचे स्वागत करण्यासाठी काय स्वयंपाक करावा, याचा भाग आहे. ताज्या मासळीचे मोल काय ते बहुतेक गोमंतकीयांना माहिती आहे आणि आणि आमच्या मधील बरेचजण सकाळी बोटी आणि मासळी बाजारातील आवाज ऐकून मोठे झाले आहेत. गोमंतकीयांचे अनेक मुद्यांवर मतभेद असतील पण चर्चेत जेव्हा मासळीचा विषय येतो; तेव्हा सर्वजण तज्ज्ञ होतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

या महोत्सवाच्या माध्यमातून पारंपारिक, आधुनिक मच्छीमार, मासळी व्यावसायिक, उद्योजक यांना एका छत्राखाली आणून त्यांचा विकास कसा व्हावा; यासाठी राष्ट्रीय परिसंवाद घेतात. या क्षेत्रात जास्तीतजास्त नाविन्य कसे आणावे, वैज्ञानिकांनी जे काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना ज्ञान देवून शाश्वत कसे करणे यावर भर देणार; असे मत्स्त्योद्योगमंत्री निळकंठ हळर्णकर यांनी सांगितले. 




हेही वाचा