विलेपार्ले पोलीस स्थानकात आहे अपहरणाचा गुन्हा नोंद

पणजी : मुंबईतून (Mumbai) बेपत्ता झालेली एक अल्पवयीन मुलगी व मुलगा (Goa) बायणा (Baina) समुद्रकिनाऱ्यावर (Beach) सापडली. मुरगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुंबईतील विलेपार्ले (Vile Parle) पोलीस स्थानकात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद झाला होता.
शुक्रवारी ही दोघेही वास्कोतील बायणा समुद्रकिनाऱ्यावर फिरताना सापडली. मुरगाव पोलिसांना मुंबईतून ही दोघेही या परिसरातील किनारपट्टी भागात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मुरगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक यशवंत रायकर, उपनिरीक्षक साईदत्त नाईक व वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक निखिल देसाई यांनी पोलीस पथक घेऊन बायणा समुद्रकिनाऱ्यावर शोध घेतला. त्यावेळी ही दोघेही सापडली. दोघेही सुरक्षित आहेत.
मुंबईतील विलेपार्ले पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. यासंदर्भात पोलीस निरीक्षक शरीफ जॅकीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.