३० हजार रुपयांची रोकड लंपास

पणजी : गोव्यातील (Goa) लिंगाभाट, पर्रा (Parra) येथील श्री नागनाथ महादेव देवस्थानची (Shri Nagnath Mahadev Temple) फंड पेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली. फंड पेटीत असलेली सुमारे ३० हजार रुपयांची रोकड पळविली.
यासंदर्भात पोलिसांना (Police) माहिती मिळताच मंदिरात येऊन पाहणी केली. पोलिसांनी तपास सुरू केला असून, धागेदोरे मिळवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी व परिसरात पाहणी केली आहे.