चोडण पुलासाठी २७४ कोटींची निविदा जारी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
09th January, 02:56 pm
चोडण पुलासाठी २७४ कोटींची निविदा जारी

पणजी : गोव्यातील (Goa) चोडण (Chodan), मयेसहीत (Mayem) डिचोलीच्या (Bicholim) लोकांना पुरक ठरणारा चोडण - साल्वादोर द मुंद पुलासाठी २७४.८३ कोटींची निविदा जीएसआयडीसीने (GSIDC) जारी केली आहे. इच्छुक कंत्राटदारांकडून ऑनलाइन स्वरूपात बोली मागवली आहे. पूल ३ वर्षांत पूर्ण करावा लागणार आहे. 

चोडण पुलासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. जमीन नावावर असलेल्या काही जमिनीच्या मालकांचा शोध लागला नसल्याने उशीर झाला आहे. तरी सुद्धा मये वा डिचोलीच्या लोकांची गरज लक्षात घेऊन पुलाची निविदा जारी करण्यात आली आहे. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हे या पुलाचा पाठपुरावा करीत आहेत. चोडण - रायबंदर फेरी मार्गावर नेहमीच गर्दी असते. या मार्गावर आता रो रो फेरी सुरू झाली असली तरी गर्दी वाढत आहे. बऱ्याच वर्षांपासून पुलाची मागणी आहे. या पुलाच्या गरजेविषयी विधानसभेतही चर्चा झाली आहे. 

हेही वाचा