
पणजी : गोवा ऊर्जा विकास एजन्सीमध्ये (गेडा) (Goa Energy Development Agency) (Geda) विविध ११ पदांसाठी भरती केली जाणार आहे. यातील सर्वाधिक ६ जागा कनिष्ठ अभियंत्यांच्या (Junior Engineer) आहेत. फील्ड असिस्टंटच्या ३ तर एलडीसी (LDC) व मास्टर क्राफ्ट्समनची प्रत्येकी एक जागा भरण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ८ डिसेंबर पर्यंत एजन्सीच्या पाटो येथील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती www.goa.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कनिष्ठ अभियंत्यांच्या ६ पैकी ३ आरक्षित असणार आहेत. यासाठी मॅट्रिक्स स्तर ५ प्रमाणे वेतन देण्यात येईल. यासाठी उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल
अथवा इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन अभियंता अभ्यासक्रमाची पदवी अथवा पदविका उत्तीर्ण आणि दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पात्र उमेदवारांची १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. एलडीसी पदासाठी आरक्षण नसेल. यासाठी बारावी अथवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मास्टर क्राफ्ट्समन पदासाठी उमेदवार बारावी अथवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या तसेच एल डी सी च्या उमेदवाराला संगणक आणि टायपिंगचे ज्ञान असणे गरजेचे आहे. दोन्ही पदांसाठी १०० गुणांची
परीक्षा घेण्यात येईल. या पदांसाठी मॅट्रिक्स स्तर २ प्रमाणे वेतन देण्यात येईल. फिल्ड असिस्टंटची एक जागा आरक्षित असेल. सर्व जागांसाठी उमेदवारांकडे पंधरा वर्षांचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ पूर्वी सादर करावेत असे आवाहन एजन्सीने केले आहे.