श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या सार्थ पंचशताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी

२८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ७७ फूट उंचीच्या श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे अनावरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27 mins ago
श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या सार्थ पंचशताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी

पैंगीण : गोव्यातील (Goa) काणकोण (Cancona)  येथील श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या (Shree Gokarn Partgali Jeevottam Math)  सार्थ पंचशताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) याठिकाणी उभारण्यात आलेल्या ७७ फूट उंचीच्या श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. 

श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या सार्थ पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने पर्तगाळी मठात विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातील श्री वीर विठ्ठल मंदिर, नुतन वैदिक भवन आणि इंदिराकांत भवन याचबरोबर श्री राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सोमवारी श्रीमद्विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

नुतन वैदिक भवनमध्ये गुरू शिष्यांसाठी अद्ययावत असे निवासी गाळे तयार करण्यात आले आहेत. तर इंदिराकांत भवनमध्ये महनीय व्यक्तींच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. त्याशिवाय सूसज्ज असे निवासी गाळे, भोजन कक्ष, योग, प्रार्थना गृहे, म्युझियम उभारण्यात आला आहे.

या ठिकाणच्या इंदिराकांत भवनाच्या उभारणीसाठी धेंपो घराण्याचे श्रीनिवास धेंपो यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. श्री. धेंपो यांनी काल सपत्नीक श्रीमद् इंदिराकांत स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी स्वामी महाराजांनी या सर्व आस्थापनांची विधिवत पूजा झाल्यानंतर आणि धार्मिक कार्यानंतर उपस्थितांना फल मंत्राक्षता आणि प्रसाद दिला. यावेळी लोलये येथील श्री आर्यादुर्गा महिला मंडळाच्या पथकाने भजन सादर केले.

या वैदिक आणि धार्मिक कार्यक्रमाला श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या केंद्रिय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, सौ. पल्लवी धेंपो, शिवानंद साळगावकर, त्यांच्या पत्नी, प्रवास नायक, भाई नायक, मंगळूर येथील मुकुंद कामत, योगेश कामत, काणकोण, गोवा तसेच कर्नाटकच्या विविध भागांतून आलेल्या मठ अनुयायी आणि भाविकांचा समावेश होता.

काणकोणच्या विविध भागातील मठाचे अनुयायी आणि भाविक स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी श्रमदान करीत असून या ऐतिहासिक अशा क्षणाला हातभार लावत आहेत.

२७ व ४ रोजी महनिय व्यक्तींची उपस्थिती

या सार्थ पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने २७ नोव्हेंबर रोजी पालिमारू मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामीजी आणि त्यांचे पट्टशिष्य श्रीमद् विद्याराजेश्वरतीर्थ स्वामीजी, तर ४ डिसेंबर रोजी कवळे मठाधीश श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामीजी आणि श्री चित्रापूर मठीधीश श्रीमद् सदयोजत शंकराश्रम स्वामीजी उपस्थित राहणार आहेत.

त्याशिवाय दररोज सकाळी ७ ते दुपारी १.१५ पर्यंत विविध धार्मिक विधी होणार आहेत. २७ व २८ रोजी सकाळी ६.३० ते ७.३० पर्यंत शिबिकोत्सव, दि. २९ रोजी राम कल्याणोत्सव आणि श्रीराम पट्टाभिषेक महोत्सव, दि. २ रोजी द्वादशा स्तोत्र पूजा, दि. ३ रोजी मखरोत्सव, दि. ४ रोजी शिबिकोत्सव, दि. ५ रोजी नौका विहार आणि दि. ७ रोजी शिबिकोत्सव आणि अष्टावधान सेवा होणार आहे.

४ पासून विविध भरगच्च कार्यक्रम

त्याशिवाय दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत मठ प्राकारात वृक्षारोपण, दि. ५ रोजी योग शिबिर, दि. ६ रोजी रक्तदान शिबिर, दि. ७ रोजी वैद्यकीय शिबिर आणि दि. ८ रोजी स्वच्छ पर्तगाळी अभियान राबविण्यात येणार आहे.

एकंदर ११ दिवस चालणाऱ्या या अभूतपूर्व अशा कार्यक्रमाची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे.

२८ रोजी पंतप्रधान मोदी येणार

येत्या दि. २८ नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ७७ फूट उंचीच्या भव्य अशा श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत.

अनुप जलोटा यांचा कार्यक्रम 

दि. २७ रोजी सकाळाचे धार्मिक विधि पार पाडल्यानंतर संध्याकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत अनुप जलोटा आणि साथींचे भक्तिसंगीत, दि. २८ रोजी रात्री ८.३० ते ११.३० पर्यंत नवी दिल्ली येथील श्री राम भारतीय कला केंद्रातर्फे रामलीला नृत्यापक नाटक, दि. २९ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत बंगळूरू येथील भालचंद्र प्रभू व रघुनंदन भट यांचा भाव पुष्पांजली कार्यक्रम, दि. ३० रोजी रात्री ९ ते ११.३० पर्यंत मुंबई येथील शंकर महादेवन आणि साथींचा सूर संध्या कार्यक्रम, दि. ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते रात्री ९.३० पर्यंत गोव्यातील मंदिरांचा नंदी दर्शन कार्यक्रम तसेच दि. ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते रात्रौ ९.३० पर्यंत स्वस्तिक सांकृतीक संस्था यांचा स्वर झंकार कार्यक्रम, दि. ४ डिसेंबर रोजी रात्री ९ ते रात्रौ ११ पर्यंत मुंबई येथील सारेगामा विजेता विश्वजित बोरवणकर, शरयू दाते आणि साथींचा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा अनोखा कार्यक्रम होईल. दि. ५ डिसेंबर रोजी रात्री ९ ते ११ पर्यंत मुंबई येथील निलाद्री कुमार आणि सत्यजित तळवलकर यांचा नाद लहरी, दि. ६ डिसेंबर रोजी रात्री ९ ते ११ पर्यंत दिल्ली येथील मैथिली ठाकूर यांचा भजन संध्या आणि दि. ७ डिसेंबर रोजी रात्री ९ ते ११ पर्यंत महेश काळे यांचा स्वर संध्या हा कार्यक्रम होणार आहे.

दिग्विजय रथयात्रा

सार्थ पंचशताब्दीनिमित्ताने सध्या श्रीराम दिग्विजय रथ यात्रा सुरू आहे. ही रथयात्रा दि. २२ पोळेमार्गे गोव्यात पोहोचणार असून संध्याकाळी ६.३० वा. पैंगीणच्या श्री परशुराम मंदिराजवळ पोचणार आहे. त्यानंतर वास्को, पणजी, पर्वरी, म्हार्दोळ, माशेल, रामनाथी, शिरोडा, रिवण, मडगाव, सावरकट्टा, मोखर्ड, सादोळशे असा दौरा करीत दि. २६ रोजी संध्याकाळी ६ वा. पर्तगाळी मठात या रथ यात्रेचे आगमन होणार आहे. ही रथ यात्रा आणि सार्ध पंचशताब्धी महोत्सवाची जय्यत तयारी सध्या या ठिकाणी सुरू आहे.


हेही वाचा