
पणजी : मतदार पडताळणी (एसआयआर) (SIR) मोहीमेमुळे जिल्हा पंचायत निवडणूक (Zilla Panchayat Election) पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाने (Election comission) सरकारला केली होती.
जिल्हा पंचायत निवडणुकीची अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत बोलताना म्हणाले.
सुधारीत मतदार यादी ७ फेब्रुवारी रोजी निश्चित होणार आहे. सरकारला जिल्हा पंचायत निवडणुका त्यापूर्वी घ्यायच्याच असतील तर घ्यायला हरकत नाही.
जिल्हा पंचायत निवडणूक व एसआयआरसाठी वेगवेगळे निवडणूक अधिकारी (आरओ) (RO) आणि साहाय्यक निवडणूक अधिकारी (एआरओ) (SRO) असायला हवेत, असेही सरकारला कळविण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल सर्व पक्षीय बैठक घेतल्यानंतर म्हणाले.