२०२६ मधील ४ सार्वजनिक सुट्ट्या शनिवार, रविवारी

कर्मचाऱ्यांची निराशा; गोवा सरकारतर्फे सुट्ट्या जाहीर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd October, 12:50 am
२०२६ मधील ४ सार्वजनिक सुट्ट्या शनिवार, रविवारी

पणजी : राज्य सरकारने २०२६ वर्षासाठीच्या सार्वजनिक, विशेष, मर्यादित, व्यावसायिक आणि बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढील वर्षी चार महत्त्वाच्या सार्वजनिक सुट्ट्या शनिवार किंवा रविवार आल्या आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या चार सुट्ट्या गमवाव्या लागल्या आहेत.
२०२६ मध्ये दोन खास सुट्ट्या आहेत, त्यापैकी महाशिवरात्र (१५ फेब्रुवारी) ही सुट्टी रविवारी आली आहे. मर्यादित सुट्ट्यांची संख्या २२ आहे. त्यापैकी गुरू रविदास जयंती (१ फेब्रुवारी) ही सुट्टी रविवारी आली आहे. एकूण ९ व्यावसायिक आणि औद्योगिक सुट्यांपैकी ३ सुट्ट्या शनिवार किंवा रविवार आल्या आहेत. तर बँकेच्या एकूण १८ सुट्ट्यांपैकी ४ सुट्ट्या शनिवार किंवा रविवार आल्या आहेत.

राज्य सरकराने संपूर्ण वर्षासाठी १८ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यापैकी ४ सुट्ट्या शनिवार-रविवार आल्या आहेत. यामध्ये ईद उल फित्र (रमजान ईद) २१ मार्च (शनिवार)‍, स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट (शनिवार), दिवाळी ८ नोव्हेंबर (रविवार), गोवा मुक्ती दिन १९ डिसेंबर (शनिवार).
.......
‘तय’ची मर्यादित सुट्टी रद्द
चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणारी तय (हरतालिका) सुट्टी यावर्षी (२०२५) मर्यादित सुटीच्या यादीत होती. मात्र, पुढील वर्षी (२०२६) तय ही मर्यादित सुट्टी असणार नाही. यामुळे पुढील वर्षी मर्यादित सुट्ट्यांची संख्या एकने कमी होऊन २२ झाली आहे.            

हेही वाचा