
मडगाव: कोकणी भाषा मंडळाच्या २०२५ च्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मंडळाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार सोहळा ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता फोंडा येथील राजीव कलामंदिर येथे पार पडणार आहे.
कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष रत्नमाला दिवकर यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी सचिव मंगलदास भट उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांची यादी:
- * कोकणी सेवा पुरस्कार: शिवनाथ नागेशकर व उल्हास पै भाटिकर

- शिवनाथ नागेशकर

- उल्हास पै भाटिकर
- * फेलिस्यू कार्दोज स्मरणार्थ शिक्षक पुरस्कार (सेराफिन कॉता पुरस्कृत): एच. मनोज

- एच. मनोज
- * माधवी सरदेसाई स्मरणार्थ शिक्षक पुरस्कार (विजय सरदेसाई पुरस्कृत): डॉ. प्रकाश पर्येंकर

- डॉ. प्रकाश पर्येंकर
- * चंद्रकांत केणी स्मरणार्थ स्तंभलेखन पुरस्कार (दिनेश मणेरकर पुरस्कृत): सखाराम बोरकर

- सखाराम बोरकर
- * लिगोरियो फुर्तादो ट्रस्ट पत्रकारिता पुरस्कार: डॅनियल डिसोझा

- डॅनियल डिसोझा
- * जुझे पीएदाद स्मरणार्थ कार्यकर्ता पुरस्कार (विन्सी क्वाद्रुश पुरस्कृत): प्रसाद पांगम आणि फ्रान्सिस फर्नांडिस

- प्रसाद पांगम

- फ्रान्सिस फर्नांडिस
- * फादर मॉरेन डिसोझा स्मरणार्थ युवा साहित्य पुरस्कार: ग्लिनीस डायस

- ग्लिनीस डायस
- * उल्हास आणि मिता वेर्लेकर युवा उद्योजिका पुरस्कार (उल्हास ज्युवेलर्स पुरस्कृत): व्हॅनीस आल्मेदा

- व्हॅनीस आल्मेदा
- * श्रीधर कामत मित्र परिवार पुरस्कृत साहित्य पुरस्कार: अर्मांद फर्नांडिस (पुस्तकाचे नाव: 'पुला पलतडी')

- अर्मांद फर्नांडिस
- * रॉक बारेटो साहित्य पुरस्कार: उदय देशप्रभू (चरित्र पुस्तकाचे नाव: 'संघर्षकाणी')

- उदय देशप्रभू
- * रमेश वेळुस्कर साहित्य पुरस्कार (कोकणी भाषा मंडळ पुरस्कृत): चेतन आचार्य (पुस्तकाचे नाव: 'यादिंचो गांव')

- चेतन आचार्य
- * रामनाथ मणेरकर स्मृती अनुवाद पुरस्कार (दिनेश मणेरकर पुरस्कृत): शैलेंद्र मेहता ('मुंबयचो वेपारी' या पुस्तकाच्या अनुवादासाठी)

शैलेंद्र मेहता
कोकणी भाषा मंडळ पुरस्कारांसाठी परीक्षक मंडळ
२०२५ सालच्या कोकणी भाषा मंडळाच्या पुरस्कारांसाठी खालील व्यक्तींचा परीक्षक मंडळावर समावेश होता:
- * सेवा पुरस्कार: कमलाकर म्हाळशी, वसंत भगवंत सावंत, डॉ. नारायण देसाई
- * पत्रकारिता पुरस्कार: विन्सी क्वाद्रूश, दिलीप बोरकर, प्रमोद आचार्य
- * शिक्षक पुरस्कार: काश्मिरी पावसकर, अनंत अग्नी, डॉ. भूषण भावे, दिलीप नाईक, सुदेश नाईक, सुनिता काणेकर
- * कोकणी कार्यकर्ता पुरस्कार: प्रशांत नायक, सेराफीन काॅता, चेतन आचार्य
- * साहित्य पुरस्कार: डॉ. किरण बुडकुले, प्रशांती तळपणकर, डॅनियल वाझ
- * युवा साहित्य पुरस्कार: अंजू साखरदांडे, अनंत अग्नी, फादर लुईस
- * बालसाहित्य पुरस्कार: नयना आडारकर, हर्षा शेट्ये, योगिनी आचार्य
- * युवा उद्योजक पुरस्कार: राजेश प्रभू, पराग लोलयेंकर, राधाकांत दिवकर
या वर्षी बालसाहित्य पुरस्कारासाठी योग्य पुस्तके उपलब्ध नसल्याने परीक्षक मंडळाने कोणतेही नाव सुचवले नाही. मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.