गोव्याचा प्रौढ साक्षरता पॅटर्न संपूर्ण देशभरात वापरणार !

एससीईआरटीच्या संचालिका शेटगावकर यांची माहिती


7 hours ago
गोव्याचा प्रौढ साक्षरता पॅटर्न संपूर्ण देशभरात वापरणार !

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे नुकताच आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कार्यक्रम पार पडला. गोवा राज्य हे साक्षरतेविषयी भारतातील दोन क्रमांकाचे राज्य आहे. राज्यातील ९९.७ टक्के लोक साक्षर आहेत. गोव्याने साक्षरता मोहीम यशस्वी करण्यासाठी वापरलेला पॅटर्न याविषयी या कार्यक्रमात माहिती देण्यात आली. गोव्याचा प्रौढ साक्षरता पॅटर्न आता देशभरात वापरण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती गोवा राज्य शिक्षण संशोधन व परीक्षण परिषदेच्या संचालिका मेघना शेटगावकर यांनी दिली.
राज्यातील एससीईआरटीच्या वतीने विविध कार्यक्रम राबवले जात अाहेत. या कार्यक्रमांमुळे साक्षरतेत वाढ झाल्याचे दिसून येते. गोवा हे शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध राज्य असून, येथे जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध आहे. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतलेले विशेष परिश्रम, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, तसेच नगरपालिका, पंचायत, स्वयंपूर्ण मित्र, समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग यामुळे हे यश शक्य झाले. संपूर्ण देशात साक्षरतेच्या क्षेत्रात गोवा आदर्शवत ठरत असून, येत्या काही दिवसांत शंभर टक्के साक्षरता साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मेघना शेटगावकर यांनी सांगितले.      

हेही वाचा