
पणजी : शहरातील रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेऊन पणजीचे आमदार व महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली. या भेटीत मोन्सेरात यांनी रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल तातडीने करण्याची मागणी केली.
कामत यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि खराब अवस्थेची दखल घेत त्वरित दुरुस्तीची हमी दिल्याचे मोन्सेरात यांनी सांगितले. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मी स्वतः सार्वजनिक बांधकाम खात्याशी सातत्याने संपर्कात आहे, असे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.