पौष्टिक खिचडी

Story: चमचमीत रविवार |
13 hours ago
पौष्टिक खिचडी

साहित्य

३/४ कप मूग डाळ
१/४ कप तांदूळ
१ मोठा टोमॅटो
१ बटाटा
१ कप गाजर
१ कप कोबी
१/२ कप मटार
१/२ कप फ्लॉवर
१/२ कप ढोबळी मिरची
१ चमचा आलं पेस्ट
१ मोठा चमचा हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
१ चमचा तूप
१ मोठा चमचा कोथिंबीर
आवश्यकतेनुसार मीठ
आवश्यकतेनुसार लाल तिखट
१/२ चमचा हळद
आवश्यकतेनुसार हिंग
१ मोठा चमचा जिरे

कृती

कुकरमध्ये मुग डाळ घालून भाजून घ्या. आता त्यात स्वच्छ धुतलेले तांदूळ व पाणी घाला. पाण्याला उकळी फुटू लागताच त्यात हळद व मीठ घाला. सर्व सामग्री शिजवण्यासाठी कुकरच्या ६ ते ७ शिट्ट्या करा.

एका पॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यात हिंग, जीरे घाला आणि चांगलं परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेले गाजर, कोबी, बटाट्याच्या फोडी, फ्लॉवर, १ कप हिरवे वाटाणे घालून सर्व सामग्री चांगली मिक्स करा.

आता त्यात चिरलेली शिमला मिरची, १ कप टोमॅटो, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, १ चमचा लाल तिखट पावडर घालून ३ ते ४ मिनिटे मध्यम आचेवर सर्व सामग्री शिजवून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर, शिजवलेल्या डाळ व तांदळात पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा. आता डाळ व तांदळाच्या मिश्रणात फ्राय केलेल्या भाज्यांचे मिश्रण घालून सर्व सामग्री चांगली एकजीव करा.

खिचडी शक्यतो गरमागरम वाढावी. त्यावर लिंबू पिळून साजूक तूप घातल्यास खिचडीची चव अजूनच वाढते. अशी ही गरमागरम खिचडी लोणचं आणि पापड एवढ्या जिन्नसासोबत खूप छान लागते.


शिल्पा रामचंद्र, 
मांद्रे