सभापती रमेश तवडकर यांनी घेतली भाजप प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खोलकर यांची भेट

मंत्रिपदाच्या शक्यतांवर पुन्हा चर्चा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th August, 04:36 pm
सभापती रमेश तवडकर यांनी घेतली भाजप प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खोलकर यांची भेट

पणजी : सभापती रमेश तवडकर यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पक्ष सुकाणू समिती सदस्य दत्ता खोलकर यांची अनपेक्षित भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. मात्र ही भेट व्यक्तीगत स्वरूपाची असून मंत्रिपद किंवा  इतर राजकीय विषयांवर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे तवडकर यांनी स्पष्ट केले.

गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटवल्यानंतर एक जागा रिक्त झाली आहे. तवडकर यांचा मंत्री म्हणून शपथविधी निश्चित असल्याचे बोलले जात असले, तरी सभापतीपदासाठी नियुक्ती होण्याची गरज असल्याने हा शपथविधी पुढे ढकलण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या तवडकर-खोलकर भेटीमुळे पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सध्या राज्याबाहेर असल्याने राजकीय हालचाली काहीशा मंदावल्या आहेत.


हेही वाचा