मडगाव : गुन्हे शाखेचा सां जुझे दी आरियाल येथे जुगार अड्डावर छापा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
मडगाव : गुन्हे शाखेचा सां जुझे दी आरियाल येथे जुगार अड्डावर छापा

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने सां जुझे दी आरियाल येथे जुगार अड्डावर छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून १.१५ लाख रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार,सां जुझे दी आरियाल येथे रेल्वे गेट जवळ असलेल्या एका घरात जुगार सुरु असल्याची माहिती गुन्हा शाखेच्या एका अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक सुरज हळर्णकर याच्या मार्गदर्शनाखाली तसेच निरीक्षक मंगेश वळवईकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवार ४ जुलै रोजी उत्तररात्री ३.४० ते पहाटे ५.४० दरम्यान वरील ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पथकाने थिओडोरियो ट्रावासो (५१, सां जुझे दी आरियाल), श्रीजीत नायर (३२, नावेली -सासष्टी), टायसन कायदो (३७, गोवा वेल्हा), रफीक लोहार (३६,नावेली - सासष्टी) आणि तोसीब हुल्लूर (३६, मोती डोंगर - आकें) या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पथकाने १.१५ लाख रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

या प्रकरणी पाच जणांविरोधात गोवा सार्वजनिक जुगार कायद्याचे कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. 

हेही वाचा