तवडकर लवकरच मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता
पणजीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जीएसटी परिषदेच्या बैठकीसाठी गुरुवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. या बैठकीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह (CM Pramod Sawant) केंद्र सरकारचे मंत्री सहभागी होणार असून, करव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सभापती रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर तवडकर यांचे नाव मंत्रिपदासाठी जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे त्यांच्या दिल्लीतल्या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, तवडकर लवकरच मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने ते भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते आणि पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत.