पेडणे : मोरजी येथे एफडीएची धडक कारवाई; ४ हॉटेल्स बंद करण्याचे निर्देश

२१ हॉटेल्समध्ये राबवली पडताळणी मोहीम

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th June, 10:28 am
पेडणे : मोरजी येथे एफडीएची धडक कारवाई; ४ हॉटेल्स बंद करण्याचे निर्देश

पेडणे : एफडीएने धडक मोहीम राबवत मोरजी येथील विट्ठलदास वाडा, मधलावाडा आणि आसपासच्या भागातील एकूण २१ हॉटेल्सची पडताळणी केली. यापैकी चार हॉटेल्स अत्यंत अस्वच्छ स्थितीत आढळल्यामुळे त्यांना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तर इतर सर्व हॉटेल्सना १४ दिवसांच्या आत आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून, नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. योग्य सुधारणा न झाल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असाही इशारा दिला आहे. 



तपासणीदरम्यान हॉटेल्समध्ये अन्नपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विक्री केली जात असल्याचे आढळले. या प्रकरणी अनुक्रमे २००० रुपये  आणि ३००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. एफडीएच्या या सातत्यपूर्ण कारवायांमुळे स्थानिक हॉटेल व्यवसायिकांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून, अनेक हॉटेल व्यवसायिक आवश्यक त्या सुधारणा करत असल्याचे पडताळणीत समोर आले आहे. 



ही कारवाई एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रिचर्ड नोरोन्हा, योगिता सिरसाट, भक्ती वाळके, राम धुरी, अमित मांद्रेकर आणि लेनिन डिसा यांच्या पथकाने केली.


हेही वाचा