केएलई विद्यापीठात ‘रेझोनन्स १.०’ उत्साहात

उपक्रमात कर्नाटकम, गोव्यातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग


05th June, 12:47 am
केएलई विद्यापीठात ‘रेझोनन्स १.०’ उत्साहात

उद्घाटन साेहळ्याला उपस्थित केएलई तंत्रज्ञान विद्यापीठ, बेळगावचे प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील, सुनील शंभतनावर, डॉ. विजय रायर आणि इतर मान्यवर. (लुईस रॉड्रिग्ज)   
प्रतिनिधी। गोवन वार्ता
बेळगाव : केएलई तंत्रज्ञान विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन विभागात ‘रेझोनन्स १.०’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. नाविन्य, संघभावना आणि तांत्रिक उत्कृष्टतेचा उत्सव ठरलेल्या या उपक्रमात कर्नाटकमधील आणि गोव्यातील विविध संस्थांतील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रगत इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स अ‍ॅण्ड सोल्युशन्स, बंगलोरचे सीईओ सुनील टी. शंभतनावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशील शिक्षणाच्या माध्यमातून नवकल्पना विकसित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात हार्डवेअर हॅकाथॉन आणि पेपर प्रेझेंटेशन हे दोन मुख्य उपक्रम आयोजित करण्यात आले होते. हार्डवेअर हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समस्यांवर आधारित सर्जनशील हार्डवेअर उपाय मांडले. पेपर प्रेझेंटेशनमध्ये संशोधनाधिष्ठित कल्पना आणि तांत्रिक दृष्टिकोन सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विजय रायर आणि डॉ. रुद्रप्पा गुजन्नट्टी यांनी आयोजन व अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली. ‘रेझोनन्स १.०’ उपक्रमातून नवकल्पनांना चालना, अनुभवाधिष्ठित शिक्षणाचा प्रसार आणि संशोधनात्मक प्रगतीसाठी असलेली विद्यापीठाची वचनबद्धता अधोरेखित झाली.