राज्यात चार दिवस पावसाचा यलो अलर्ट

१७ ते २० मे दरम्यान वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस शक्य

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th May, 09:38 pm
राज्यात चार दिवस पावसाचा यलो अलर्ट
⚠️ यलो अलर्ट
📅 प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : हवामान खात्याने राज्यात १७ ते २० मे दरम्यान वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या चार दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

🌧️ पावसाचा अंदाज

दि. २१ आणि २२ मे रोजी किरकोळ पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली.

शुक्रवारी पणजीत कमाल ३५.८ अंश तर किमान २७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३३.८ अंश तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहीले.

🌡️ तापमान अंदाज

पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३४ ते ३५ अंश तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

💧 पावसाचे प्रमाण

राज्यात २४ तासात सरासरी ५.२ मिमी पाऊस. केपेमध्ये ३५ मिमी तर धारबांदोड्यात ३३.१ मिमी पावसाची नोंद. १ मार्च ते १६ मे दरम्यान सरासरी २४.७ मिमी पाऊस.

⚠️ महत्वाची सूचना

१७ ते २० मे दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये असे आवाहन खात्याने केले आहे.

शुक्रवारी मान्सूनने श्रीलंकेच्या दक्षिण सीमेपर्यंत आगेकूच केली. पुढील २ ते ३ दिवसात मान्सून अंदमान बेटे, अंदमानात, बंगालच्या उपसागराच्या मध्यभागात आगेकूच करण्याची शक्यता आहे.