चंद्रपूर : 'प्रेमासाठी कायपण' म्हणत ताडोबामधील वाघोबाने उठवले रान!

मादी आणि जंगलातील वर्चस्वासाठीच्या रक्तरंजित संघर्षाने वन अधिकारी, अभ्यासक आणि वन्यप्रेमी झाले थक्क

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th May, 05:05 pm
चंद्रपूर : 'प्रेमासाठी कायपण' म्हणत ताडोबामधील वाघोबाने उठवले रान!

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगलात सध्या एका वाघाच्या प्रेमकहाणीने आणि त्यातून सुरू झालेल्या रक्तरंजित संघर्षाने वन्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं आहे. 'छोटा मटका' नावाचा वाघ आपल्या प्रिय 'नयनतारा' वाघिणीच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की, तिच्या जवळ जाणाऱ्या प्रत्येक वाघाचा त्याने जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे.



सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ताडोबाच्या खडसंगी वनपरिक्षेत्रातील 'निमढेला बीट'मध्ये कक्ष क्रमांक ६३ मध्ये 'छोटा मटका' आणि 'ब्रह्मा' या दोन नर वाघांमध्ये भीषण झटापट झाली. 'ब्रह्मा' हा देखील 'नयनतारा' वाघिणीच्या आसपास वावरत होता. हे लक्षात येताच 'छोटा मटका'ने त्याच्यावर हल्ला चढवला आणि सुमारे ४-५ तास चाललेल्या रक्तरंजित लढाईनंतर 'ब्रह्मा'चा मृत्यू झाला. या संघर्षात 'छोटा मटका' स्वतःही जखमी झाला असून त्याला लंगडत चालताना काही पर्यटकांनी पाहिले .


ताडोबात पेटलं प्रेमयुद्ध ! 'नयनतारा'वर डोळा, 'छोटा मटका'ने केला 'ब्रह्मा'चा  गेम - Marathi News | love war broke out in tadoba the eyes on nayantara chhota  matka played end a game of


ही घटना मंगळवारी सकाळी समोर आली. येथे जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या काही पर्यटकांनी वाघाच्या तोंडाला रक्त लागलेले पाहून वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने तातडीने शोधमोहीम राबवून 'ब्रह्मा'चा मृतदेह शोधून काढला आणि शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलवला.



ताडोबाचा डॉन 'छोटा मटका'च!

'छोटा मटका'ने  ताडोबाच्या रामदेगी परिसरात आधीपासूनच आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 'नयनतारा'वर आपला हक्क असल्याच्या भावनेतून त्याने याआधीही 'मोगली' आणि 'बजरंग' नावाच्या वाघांनाही ठार केल्याचेही वन अधिकाऱ्यांनी  नोंदवले आहे. आता 'ब्रह्मा'चा बळी घेत त्याने पुन्हा एकदा आपली ताकद आणि वर्चस्व दाखवलं आहे.



वन्यप्रेमींमध्ये खळबळ; वनविभाग मात्र सतर्क

ही घटना समजताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमासाठी वन्यप्राण्यांमध्येही असा संघर्ष होतो याचे हे उदाहरण अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे. सध्या 'छोटा मटका'च्या हालचालींवर वनविभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे.


UCN News Live | Live News in Nagpur | Vidharbha News


नैसर्गिकरीत्या वाघांमध्ये वर्चस्वासाठी अशा लढाया होतात. या संघर्षात एक वाघ मरण पावतो हे दुर्दैवी असले तरी जंगलातील नैसर्गिक व्यवहाराचा तो एक भाग आहे. मात्र, या प्रकरणामुळे परिसरातील इतर वाघांची हालचाल, पर्यटकांची सुरक्षितता आणि वाघांचा सामाजिक बिघाड टाळण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. 


हेही वाचा