सासष्टी : नर्सवर लैंगिक अत्याचार; प्रसिद्ध डॉक्टरला अटक

कुंकळ्ळी पोलिसांची कारवाई

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
26th April 2025, 05:10 pm
सासष्टी : नर्सवर लैंगिक अत्याचार; प्रसिद्ध डॉक्टरला अटक

मडगाव : सासष्टी परिसरात एका नर्सवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चौकशीअंती डॉक्टर सॅम्युएल आरवाट्टीगी याला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणी न्यायालयाकडून संशयिताला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईला बुधवारी ही घटना समजताच तिने तत्काळ पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंद केली. चिंचणी येथील सेवदा क्लिनिक अँड डायग्नोस्टिक क्लिनिकमध्ये पीडिता कार्यरत होती. मंगळवारी रात्री संशयित डॉ. सॅम्युएल यांनी पीडित नर्सला एका रुग्णाची तपासणी त्याच्या घरी जाऊन करायची असल्याचे सांगून तिला आपल्यासोबत नेले. 

यानंतर संशयिताने पीडितेला आपल्या बाणावलीतील खोलीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने घडलेला प्रकार घरी येऊन कुटुंबीयांना सांगितल्यानंतर आईकडून पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली. लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर कुंकळ्ळी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला. याप्रकरणी चौकशीअंती कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित डॉक्टरला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलीस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वेळीप पुढील तपास केला जात आहे.


हेही वाचा