तिसवाडी तालुक्यातील युवकाविरोधात आरोप निश्चितीचा आदेश
पणजी : लग्नाचे आमिष दाखवून दिल्लीतील एका महिलेवर २०२३ मध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन न्यायालयाने तिसवाडी तालुक्यातील युवकाविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. याबाबतचा आदेश पणजी येथील जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांनी दिला आहे.
याप्रकरणी दिल्ली येथील दोन मुलाच्या पीडित महिलेने पणजी पोलीस स्थानकात ११ जानेवारी २०२४ रोजी तिसवाडी तालुक्यातील संशयिताविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात संशयिताने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर १ जून २०२३ ते ११ जानेवारी २०२३ रोजी दरम्यान तिसवाडी तालुक्यातील संशयिताच्या घरी तसेच बार्देश तालुक्यातील एका ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार, पणजी महिला पोलीस स्थानक निरीक्षक रीमा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली गोवेकर यांनी संशयितांविरोधात भादंसंच्या कलम ४२० आणि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याच दरम्यान संशयिताने उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला. तो फेटाळण्यानंतर संशयिताने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने संशयिताला सशर्त अटकपूर्व मंजूर केला. त्यानंतर महिला पोलिसांनी तपासपूर्ण करून म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात ३१६ पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात १९ साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आली आहे.
३१६ पानी आरोपपत्र दाखल
महिला पोलिसांनी तपासपूर्ण करून म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात ३१६ पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात १९ साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयाच्या अधिकार क्षेत्र येत असल्यामुळे तिथे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने संशयिताविरोधात प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे.