आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!

बॉलीवूडचा चेहरा-मोहरा बदलणार ‘छावा!’

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
14th February, 12:23 am
आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!

आज चित्रपटगृहात गुंजणार ‘हर हर महादेव’चा नारा, कारण प्रदर्शित होतोय बहुचर्चित ‘छावा!’ यासह अनेक चित्रपट आणि मालिका ​ओटीटी आणि चित्रपटगृहात झळकणार आहेत.


छावा । थिएटर
बहुचर्चित ‘छावा’ आज चित्रपटगृहात झळकणार आहे. शिवाजी सावंत यांच्या कादंबरी ‘छावा’ वर आधारित हा चित्रपट म्हणजे ऐतिहासिक महाकाव्य आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असून यसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मनधाना, तर औरंगझेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे.


धूम धाम । नेटफ्लिक्स
यामी गौतम आणि प्रतीक गांधी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अ‍ॅक्शन-पॅक्ड रोमँटिक कॉमेडी आहे. जो एका नवविवाहित जोडप्याभोवती फिरतो, जे एका रहस्यमय चार्लीचा शोध घेत असताना धोकादायक गुन्हेगार आणि पोलिसांच्या चक्रव्यूहमध्ये अडकतात. 


मार्को । सोनी लिव्ह
अ‍ॅक्शन सीक्वेन्स भरपूर हा मल्याळम चित्रपट एका गुंडाची कथा आहे. जो आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मोहिमेवर निघतो. हनीफ अदेनी दिग्दर्शित या चित्रपटात उन्नी मुकुंदन मुख्य भूमिका साकारत आहेत.


द गॉर्ज । अ‍ॅपल टीव्ही+
हा ​चित्रपट लेव्ही आणि द्रासा (माइल्स टेलर आणि अन्या टेलर-जॉय) या दोघांना एका रहस्यमय घाटीमध्ये तैनात करण्यात आले आहे. जगाच्या रक्षणासाठी पलिकडून येणाऱ्या अज्ञात आणि दुष्ट शक्तींचा त्यांना सामना करायचा आहे. धोकादायक दरवाजा उघडल्यानंतर ते जगाचे रक्षण करू शकतील काय, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल.


कॅप्टन अमेरिका: ब्रेव्ह न्यू वर्ल्ड । थिएटर्स
हा सुपरहिरो चित्रपट नवीन कॅप्टन अमेरिका सॅम विल्सनभोवती केंद्रित आहे. तो राष्ट्राध्यक्ष थॅडियस रॉस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर एका विनाशकारी हल्ल्यात अडकतो. तो त्यामागील खरा सूत्रधार पकडण्यात यशस्वी होईल का, हे पाहण्यासाठी आपल्याला चित्रपटगृहात जावे लागेल.


मेलो मुव्ही । नेटफ्लिक्स
हा कोरियन चित्रपट एका चित्रपटप्रेमीची कथा आहे, ज्याचे आयुष्य एका महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्मात्याच्या प्रेमात पडल्यावर बदलते. या चित्रपटात चोई वू शिक आणि पार्क बो यंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.


सबसर्व्हियन्स । लायन्सगेट प्ले
मेगन फॉक्स आणि मिशेल मोरोन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा साय-फाय थ्रिलर चित्रपट आहे. एक व्यक्ती आपल्या घरगुती कामासाठी गायनॉइड (एक स्त्रीलिंगी मानवीय रोबोट) भाड्याने घेतो. त्याची आजारी पत्नी हृदय प्रत्यारोपणाची वाट पाहत असते. गायनॉइड स्वतःला जागरूक करते आणि प्राणघातक बनते आणि परिस्थिती धोकादायक वळण घेते.


प्यार टेस्टिंग । झी ५
ही कथा ध्रुव आणि अमृता यांच्यावर आधारित आहे, जे त्यांच्या कुटुंबियांनी ओळख करून दिल्यानंतर त्यांच्या सुसंगततेची चाचणी घेण्यासाठी लग्नापूर्वी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. ते एकमेकांबद्दल भावना निर्माण करू शकतील का, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेल.


आय अॅम मॅरिड...बट! । नेटफ्लिक्स
ली निएन-ह्सियू यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट एका विवाहित पुरुषाच्या अवतीभवती फिरतो. जो लग्नाच्या रहाटगाड्यातून स्वत:चे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत आहे.