थिएटर्सचे नुकसान राज्य सरकार देणार भरून

२१ फेब्रुवारी ते ३१ मेपर्यंत चित्रपट प्रदर्शनासाठी कोणताही कर नाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th February, 11:40 pm
थिएटर्सचे नुकसान राज्य सरकार देणार भरून

पणजी : राज्यातील चित्रपटगृहे तसेच मल्टिप्लेक्समध्ये 'छावा' चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या संदर्भात एक आदेश जारी करण्यात आला आहे. २१ फेब्रुवारी ते ३१ मेपर्यंत चित्रपट प्रदर्शनासाठी कोणताही कर आकारला जाणार नाही. मल्टीप्लेक्स तसेच थिएटर्सनी तिकिटांवर एसजीएसटी आकारू नये, असे आदेशात म्हटले आहे. तिकिट पावत्या तसेच इतर कागदपत्रे सरकारकडे सादर करावीत. सरकार थिएटर्स तसेच मल्टिप्लेक्सना एसजीएसटी शुल्क परत करेल, असे आदेशात म्हटले आहे.

आमदार संकल्प आमोणकर यांनी राज्यात ‘छावा’ करमुक्त करण्याची मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवजयंती समारंभात ‘छावा’ चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली. घोषणेनंतर दुसऱ्या दिवशी आदेश जारी करण्यात आला.एसीजीएसटी राज्य कर आयुक्तांकडे देयकासाठी सादर करणे आवश्यक आहे. मूळ तिकिटाची किंमत वाढवता येणार नाही. थिएटर्स मालकांना भरपाई दिली जात असल्याने प्रेक्षकांकडून एसजीएसटी वसूल केला गेला नाही, याचा पुरावा सादर करावा लागेल.