'छावा'च्या गर्जनेने बॉक्स ऑफिस हादरलं

२०२५मधील ५०० कोटींहून अधिक कमवणारा ठरला पहिला चित्रपट

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11th March, 10:41 am
'छावा'च्या गर्जनेने बॉक्स ऑफिस हादरलं

मुंबई : विकी कौशल, रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर जबदरस्त कमाई करत आहे. गेल्या दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दाखल झालेल्या चित्रपटांचा 'छावा'समोर टीकाव लागला नाहीये. त्यामुळं हा मार्च महिना देखील बॉक्स ऑफिसवर 'छावा'चेच राज्य असणार हे नक्की आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपट हा २०२५ मधला ५०० कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. २५ व्या दिवशी देखील ‘छावा’ चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.

छावा सिनेमाच्या आता पर्यंतच्या कमाईवर नजर टाकली असता सिनेमाने पहिल्याच दिवशी ३१ कोटींची दमदार कमाई केली होती. चित्रपटाची जोरदार ओपनिंग झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं २१९.२३ कोटींची कमाई केली. 

तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने १८०.२५कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या आठवड्यात सिनेमाने ८४.०५ कोटींची कमाई केली. तर २२ व्या दिवसाची कमाई ही ८. ७६ कोटी इतकी होती. त्यामुळे २३ व्या दिवशी १६ कोटींच्या वर कमाई झाल्यानंतर येत्या काही दिवसांतही सिनेमा तग धरेल यात शंका नाही.