गोवा : तृणमूल काँग्रेस पंचायत, विधानसभा निवडणुक लढवणार : ट्रोजन डिमेलो

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
12th February, 01:28 pm
गोवा : तृणमूल काँग्रेस पंचायत, विधानसभा निवडणुक लढवणार : ट्रोजन डिमेलो

पणजी : तृणमूल काँग्रेस जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुका लढवणार आहे. यासाठी आम्ही तळागाळात काम सुरू केले आहे. आमचा पक्ष गोव्यातून निघून जाणार या केवळ अफवा असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी सांगितले. बुधवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या यावेळी पक्षाचे सह संयोजक मारीयानो रॉड्रिग्ज उपस्थित होते.

ट्रोजन म्हणाले की, तृणमूल काँग्रेस गोव्यातून बाहेर पडणार अशा अफवा पसरवल्या जात आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला कमी कालावधी मिळाला होता. असे असून देखील आम्ही आठ टक्के मते घेतली होती. तेव्हापासूनच आमची तयारी सुरू आहे. आम्ही जिल्हा पंचायत तसेच आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. गोव्यातील युतीबाबत आमचे राष्ट्रीय नेते निर्णय घेतील.  

रॉड्रिग्ज म्हणाले की, गोव्यात पक्षाचे आमदार अथवा खासदार नाहीत. असे असले तरी आमचे खासदार डेरिक ओ ब्रायन यांनी राज्यसभेत गोव्यातील रापणकारांचे प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी त्यांनी वेळसाव येथील मच्छीमारांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजावून घेतले होते. गोव्यातील भाजप, काँग्रेसच्या खासदारांनी जे केले नाही ते तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केले. यापुढेही आमचा पक्ष गोव्यातील शेतकरी, मच्छीमार व अन्य पारंपारिक व्यावसायिकांची प्रश्न हाती घेणार आहे.

हेही वाचा