श्री बोडगेश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी अॅड. वामन पंडित

बार्देश तालुक्यातील ३२ मंदिर समित्यांची बिनविरोध निवड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th February, 12:44 am
श्री बोडगेश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी अॅड. वामन पंडित

म्हापसा : देव बोडगेश्वर देवस्थान समितीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. वामन पंडित यांनी विजय मिळवून आनंद भाईडकर यांना धक्का दिला. तब्बल आठ तासांपेक्षा जास्त काळ मतमोजणी चालली. या निवडणुकीसाठी मतदानावेळी महाजनांनी ऐतिहासिक प्रतिसाद दाखवला. एकूण १४१६ मतदारांपैकी ११८९ महाजनांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, बार्देश तालुक्यातील ३४ पैकी ३२ देवस्थान समितींची निवड बिनविरोध झाली. तर कांदोळीतील श्री शांतादुर्गा देवस्थानची निवडणूक कोरमअभावी पुढे ढकलली. 

आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही निवडणूक सुरळीत व शांततेत पार पडली. तालुक्यातील ३२ देवस्थानच्या नूतन कार्यकारिणीची निवड महाजनांकडून बिनविरोध झाली. म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर संस्थानची निवडणूक अपेक्षेप्रमाणे चुरशीची झाली. विद्यमान कार्यकारी मंडळात फूट पडून विद्यमान अध्यक्ष आनंद भाईडकर, विद्यमान सचिव अॅड. वामन पंडित व माजी अध्यक्ष अॅड. महेश राणे यांचे तीन पॅनल या निवडणुकीत उतरले होते. अपेक्षेनुसार चुरशीची लढत बघायला मिळाली. 

श्री बोडगेश्वर देवस्थान अध्यक्षपदी ॲड. वामन पंडित

म्हापसा येथील श्री बोडगेश्वर देवस्थाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. वामन पंडित विजयी झाले. उपाध्यक्षपदी अमेय कोरगावकर, सचिवपदी हरिश्चंद्र गावकर, खजिनदारपदी श्यामसुंदर पेडणेकर, सहसचिवपदी कुणाल धारगळकर, उपखजिनदारपदी विशांत केणी, मुखत्यारपदी राजेंद्र पेडणेकर, उपमुखत्यारपदी साईनाथ राऊळ यांची निवड झाली.      

तालुक्यातील बिनविरोध समित्या

२०२५-२८ या कालावधीसाठी श्री लक्ष्मीनारायण देवस्थान बामणवाडा-शिवोली, श्री सातेरी देवस्थान, गांवसावाडा-शिवोली, श्री देवी कालिका देवस्थान, चोपडे, श्री सातेरी संस्थान, खोर्ली, श्री राष्ट्रोळी देवस्थान मंदिर, खोर्ली-सीम, श्री महारुद्र संस्थान, म्हापसा, श्री दत्त मंदिर देवस्थान, म्हापसा, श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, अन्साभाट,  श्री लक्ष्मीनारायण संस्थान, म्हापसा, श्री शांतादुर्गा निर्लीकरीण, आंबेखण-रेईश मागूश, श्री चौरंगीनाथ देवस्थान, सिमवाडा-हडफडे, श्री साई संस्थान-कांदोळी, श्री सिद्धेश्वर देवस्थान, कायसूव, श्री रातळेश्वर देवस्थान, हळदोणा, श्री देवी माऊली देवस्थान, नादोडा, श्री भूतनाथ देवस्थान, माडांत-नादोडा, श्री देव माऊली वेताळ भूतनाथ, रेवोडा, श्रीराम देवस्थान-कोलवाळ, श्री महारुद्र देवस्थान, विर्लोसा, श्री शांतादुर्गा देवस्थान, पीर्ण, श्री भूमिका सातेरी देवस्थान, गिरी, श्री रवळघाडी पंचायतन, नास्नोळा, श्री देवी सातेरी भगवती, हळदोणा, श्री राष्ट्रोळी पारपोळेश्वर देवस्थान, गिरी, श्री लिंगभाट देवस्थान, पर्रा, श्री शांतादुर्गा देवस्थान, कळंगुट, श्री देवी भूमिका पंचायतन, गाववाडी-हणजूण, श्री सातेरी महामाया पालयेकरीण, पालये-उसकई, श्री रवळनाथ देवस्थान, किटला, श्री शांतादुर्गा देवस्थान, अस्नोडा, श्री कृष्णा देऊळेश्वर, वेरे व श्रीकृष्ण रवळनाथ देवस्थान, एकोशी या देवस्थान समितींची निवड बिनविरोध झाली आहे.

शांततेत मतदान

देव बोडगेश्वर सभागृहात निवडणूक स्थळी महाजनांनी सकाळपासूनच मतदानासाठी मोठी रांग केली होती. एकूण १४१६ मतदार महाजनांपैकी ११८९ मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावला.  दरम्यान, नव्याने समावेश करण्यात आलेल्या २५४ महाजनांमुळे आपल्या गटाचा पराभव झाल्याचा आरोप विरोधी गटातर्फे करण्यात आला आहे.


हेही वाचा