केपे : धक्कादायक ! शिगम्यात ताशा वाजवताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एकाचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
केपे : धक्कादायक ! शिगम्यात ताशा वाजवताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एकाचा मृत्यू

पणजी : राज्यात शिगमोत्सव सुरू झाला आहे. मांडावर पारंपरिक पद्धतीने नमन करून  शिगम्याचे खेळ खेळले जात आहेत. या दरम्यान केपे तालुक्यातील कणीबाग, मोरपिर्ला येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काल सायंकाळी येथे वेळीपांच्या शिगम्याच्या मांडावर ताशा वाजवताना श्रीकांत गांवकर (५०,काजुवाडा,कणीबाग-मोरपिर्ला) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते कोसळले. यावेळी उपस्थित असलेल्यांनी त्यांना सावरत तातडीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. दरम्यान त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांचा मृत्यू झाला. 

श्रीकांत गांवकर हे वीज खात्यात कार्यरत होते. त्यांनी मोरपिर्ला पंचायतीच्या पंचपदी काम केले आहे. तसेच गांवकर हे एकता युवा संघाचे संयुक्त सचिव म्हणून देखील कार्यरत होते. गेल्या दोन दशकांपासून त्यांचा सामाजिक क्षेत्रात वावर होता. या घटनेने अवघ्या तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा