पेडणेः पार्से येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, आगीत घराचे छप्पर भस्मसात

आमदार जीत आरोलकर तातडीने मदत करणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th February, 03:27 pm
पेडणेः पार्से येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, आगीत घराचे छप्पर भस्मसात

पेडणेः पार्से पंचायत क्षेत्रातील प्रतीक नाईक यांच्य राहत्या घराला आग लागून जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त नुकसानी होण्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता घडली. आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण समजू शकले नाही. 

 पेडणे अग्निशमन दलाला माहिती मिळताच, जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र एकंदरीत या आगीत तीन लाखापेक्षा जास्त नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती पेडणे अग्निशमन दलाने दिली.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नाईक कुटुंबीयांचे सांत्वन करत असताना सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही दिली. 


एक- दोन दिवसात आगीत जळालेल्या छपराच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होऊन त्या कुटुंबीयांना घरात राहण्याची सोय केली जाईल, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले. यावेळी स्थानिक पंच स्वप्नील नाईक, माजी उपसरपंच तथा विद्यमान पंच अजित मोरजकर आदी नागरिक उपस्थित होते.  

हेही वाचा