एकजण ठार तर एकजण जखमी
फोंडा : संजीवनी साखर कारखान्याच्या समोरील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून केटीएम दुचाकी चालक महमदरिफ हुसेनबाशा मोमीन (२८, भूमिकानगर- उसगाव, मूळ कर्नाटक) याचा मृत्यू झाला तर मागे बसलेला रोहित निकोलस कुजर (२०, भूमिकानगर-उसगाव, मूळ झारखंड) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर गोमेकोत उपचार करण्यात येत आहेत. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी संपवून घरी परत येत असतानाच झालेल्या अपघातात महमदरिफ मोमीन याचा मृत्यू झाला. फोंडा पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे.
मोले परिसरतून उसगाव येथे जात असताना गुरुवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. जीए -०३-एबी-७०५१ क्रमांकाची केटीएम दुचाकी घेऊन सकाळी उसगाव येथे जात होते. त्यावेळी मोलेच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक दुचाकीला बसली. धडक बसल्यानंतर मृत झालेला महमदरिफ मोमीन हा काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन कोसळला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात मृत झालेल्या महमदरिफ मोमीन हा नेसले कंपनी कंत्राट पद्धतीवर काम करीत होता. बुधवारी रात्रपाळीला न जाता मित्राच्या वाढदिवसाला गेले होते. अपघातात मृत झालेल्या युवकाला दोन महिन्याचा मुलगा आहे. तर काही दिवसापूर्वी जुनी केटीएम दुचाकी त्याने खरेदी केली होती. जखमी झालेल्या रोहित कुजर याच्यावर सध्या गोमेकोत उपचार सुरु आहे. दुचाकीला धडक देऊन पळ काढलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहे. . मित्राबरोबर वाढदिवसाची पार्टी संपून रात्री अकरा वाजता घरी परतण्याचे आश्वासन महमदरिफ मोमीन कुटुंबीयांना दिले होते. पण पार्टी पूर्ण होण्यास उशीर झाल्याने सकाळीच घरी जाण्याचा घेतलेला निर्णय मृत्यूस कारणीभूत ठरला.
दरम्यान गुरुवारी सकाळी ९. ३० वाजण्याच्या सुमारास खुरसाकडे -उसगाव येथे रस्त्यावर हॉटमिक्सिंगचे काम करणाऱ्या मारुती अशोक नेर्लेकर (२०, उसगाव, मूळ उत्तरप्रदेश) हा कामगार दुचाकीची धडक बसून जखमी झाला आहे. जखमीला उपजिल्हा इस्पितळात दाखल केल्यानंतर अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे