कारची धडक चुकवण्याच्या प्रयत्नात घडला अपघात
फोंडा : बांदोडा येथील उडाण पुलावर शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कारची धडक चुकवण्याच्या नादात कंटेनर रस्त्यावर कलंडला. अपघातात कंटेनर चालक सुखरूप बचावला आहे.
प्राप्त माहितीनुसार मुंबई येथून गोव्यात दाखल झालेला एमएच-४६-बीबी-६२०४ क्रमांकाचा कंटेनर ढवळी येथील रस्त्यावरून जात होता. बांदोडा येथील उडाण पुलाच्या धोकादायक वळणावर त्याच दिशेने जाणाऱ्या एका कारची धडक चुकवण्याचा प्रयत्न करत असताना कंटेनर दुभाजकांना धडक देऊन रस्त्यावर कलंडला. यात चालक सचिन कांबळी सुखरूप बचावला.आतापर्यंत याच ठिकाणी १० पेक्षा अधिक वाहनांचा अपघात घडला आहे. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचांनामा केला आहे.