१५ जानेवारी रोजी आयोजन : ३ कोटी ३६ लाखांची बक्षिसे
मुंबई : आशियातील सर्वात प्रतिष्ठित मॅरेथॉन असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये रविवारी, १९ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर विक्रमी ६० हजार धावपटू स्टार्ट लाईनवर उतरताना दिसतील.
एलिट (मुख्य) मॅरेथॉनमध्ये विक्रमी ११,७९१ धावपटूंची नोंदणी हा आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग असेल. हाफ मॅरेथॉन (१३७७१), १० किमी (७१८४), चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी (१०८९), ज्येष्ठ नागरिकांची रन (१८९३), आणि ड्रीम रनसाठी (२४२३८) मोठया प्रमाणात नोंदणी झाली आहे. मॅरेथॉनच्या व्हर्च्युअल रनसाठी नोंदणी बुधवार, १५ जानेवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत चालू राहतील
आंतरराष्ट्रीय इव्हेंटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आतापर्यंत सर्वाधिक अंतर पार केलेला पुरुष ट्रॅक डिस्टन्स धावपटू मो फराह याची या जागतिक ॲथलेटिक्स गोल्ड लेबल रेसचा आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर (इंटरनॅशनल इव्हेंट ॲम्बेसेडर) म्हणून निवड केल्याची घोषणा टाटा मुंबई मॅरेथॉनचे प्रवर्तक (प्रमोटर) प्रोकॅम इंटरनॅशनल यांनी केली.
फराहने चार ऑलिम्पिक आणि सहा जागतिक सुवर्णपदके जिंकली आहेत. ऑलिम्पिक (२०१२ आणि २०१६) आणि जागतिक (२०१३ आणि २०१५) अशा दोन्ही स्पर्धांमध्ये ५ हजार मीटर आणि १० हजार मीटर धावणे प्रकारात विजेतेपद राखणारा तो पहिला पुरुष धावपटू आहे. त्यामुळे 'क्वाड्रॅपल डबल' असे त्याचे वर्णन केले जाते. ४१ वर्षीय फराहने सलग १० जागतिक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम आपल्या नावे केला आहे.
जगातील अव्वल १० मॅरेथॉनमध्ये स्थान मिळालेल्या आणि ३ कोटी ३६ लाखांची बक्षिसे असलेल्या टाटा मुंबई मॅरथॉनमध्ये यंदा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा समावेश असेल. त्यात पुरुष गटात गतविजेते हेले लेमी बेरहानू आणि श्रीनु बुगाथा तसेच महिला गटातील विजेत्या अबराश मिन्सेवो आणि ठाकोर निर्माबेनचा समावेश आहे.
नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ जानेवारी
मॅरेथॉनच्या व्हर्च्युअल रनसाठी नोंदणी बुधवार, १५ जानेवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत चालू राहतील. अधिक माहितीसाठी https://tatamumbaimarathon.procam.in/. वर लॉगऑन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.