गुन्हे वार्ता : सिद्दीकी सुलेमान, अमित नाईकचा शोध सुरू

सिद्दीकीला विशेष वागणूक दिल्याच्या आरोपांचे पोलिसांकडून खंडन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th December, 11:07 am
गुन्हे वार्ता :  सिद्दीकी सुलेमान, अमित नाईकचा शोध सुरू

पणजी : तुरुंगातून पलायन केलेल्या  सिद्दीकी उर्फ सुलेमान खान आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित नाईकचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. त्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी गोवा पोलीस शेजारील राज्यांच्या पोलिसांच्या संपर्कात आहेत. जमीन घोटाळे प्रकरणांत अटक झालेल्या सिद्धीकी खानला कधीच विशेष वागणूक दिली नसल्याचे निवेदन आज सकाळी गोवा पोलिसांनी जारी केले. 

दरम्यान, जमीन हडप प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला सराईत गुन्हेगार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान (५४, रा. म्हापसा) हा पसार झाल्याची धक्कादायक बातमी सकाळी ५ वा. घटना उघडकीस आली होती. विशेष म्हणजे त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल अमित नाईक याने पलायन करण्यात मदत केली. सदर घटनेची वाच्यता होताच विशेष चौकशी पथक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.  या घटनेनंतर गुन्हा शाखेच्या सुरक्षा यंत्रणेवर  प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पूर्व नियोजित कट आखत संशयिताने पलायन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

 प्राप्त माहितीनुसार,  ही घटना शुक्रवारी पहाटे २.३० ते ३.०० च्या सुमारास घडली. संशयित कॉन्स्टेबलने सुलेमान खानला आधी कोठडीतून बाहेर काढले. नंतर सुलेमानला आपल्याच दुचाकीवर बसवून त्याने पलायन केले. मिळालेल्या माहितीप्रमाणे हे दोघे कोणत्या दिशेने गेलेत याचा राज्य पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमाने माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. संशयित  सिद्दीकी(सुलेमान) खान यास मागे १२ नोव्हेंबर रोजी एसआयटीने  हुबळीहून अटक केली होती. गेल्या चार वर्षांपासून  तो फरार होता. संशयितावर जमीन हडप प्रकरणे, खून, खूनी हल्ला व फसवणूक या सारखे  देशभरात एकूण १५ गुन्हे नोंद आहेत.

हेही वाचा