युवतीच्या छेडछाडप्रकरणी चार मद्यधुंद पर्यटकांना अटक

जुने गोवे येथील घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th December, 12:14 am
युवतीच्या छेडछाडप्रकरणी चार मद्यधुंद पर्यटकांना अटक

पणजी : कदंब बायपास मार्गावर मद्यधुंद अवस्थेतील चार पर्यटकांनी छेडछाड, विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी जुने गोवे येथील एका युवतीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी ए. रघुवेंद्र आनंदा, अस्लम खान, राघवेंद्र एच. उर्फ इदागी व संतोष कुमार (सर्व रा. कर्नाटक) या पर्यटकांना शुक्रवारी अटक केली.

युवतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती आणि तिचा प्रियकर कदंब बायपासवरून दुचाकीवरून जात असताना साईबाबा मंदिर ते मेरशी उड्डाणपूल या परिसरात के. ए. ०५, एनसी. ९९२९ या कारमधून मद्यधुंद अवस्थेत येत असलेल्या चौघांनी आपला पाठलाग सुरू केला. त्यानंतर त्यांनी आमची दुचाकी थांबवून धमकी देत आपल्या प्रियकरासह आपल्यालाही​ मारहाण केली, आपला विनयभंग केल्याचे पी​डित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेत जुने गोवे पोलिसांनी पुढील चौकशी सुरू करीत ए. रघुवेंद्र आनंदा, अस्लम खान, राघवेंद्र एच. उर्फ इदागी व संतोष कुमार या कर्नाटकातील बंगळुरू येथील पर्यटकांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांद्वारे गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. 

हेही वाचा