नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; दीपाश्री सावंतला जामीन मंजूर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th December, 12:06 am
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; दीपाश्री सावंतला जामीन मंजूर

पणजी : लेखा खात्यात नोकरीचे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी दीपाश्री सावंत हिला पणजी प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळल्याप्रकरणी तिला पणजी पोलिसांनी अटक केली होती.

दीपाश्री सावंत हिला प्रथम फोंडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तिला म्हार्दोळ पोलिसांनी ट्रान्झिट रिमांडवर अटक केली होती. म्हार्दोळ पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपासात सहकार्य करून पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या अटीवर तिला जामीन मंजूर करण्यात आला. पाणीपुरवठा खात्याचे अभियंता संदीप परब यांनी फिर्याद दिल्यानंतर म्हार्दोळ पोलिसांनी तिला अटक केली. नोकरी देण्यासाठी तिने ३.८८ कोटी रुपये घेतल्याची तक्रार संदीप परब यांनी केली होती.

हेही वाचा