विद्युत रोषणाईचे काम करताना दवर्लीत शॉक लागून युवकाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th December, 12:16 am
विद्युत रोषणाईचे काम करताना दवर्लीत शॉक लागून युवकाचा मृत्यू

मडगाव : दवर्ली येथील दत्त मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने विद्युत रोषणाईचे काम करत असताना विजेचा शॉक बसल्याने अनिकेत नाईक (२१, रा. लयामती, दवर्ली) याचा मृत्यू होण्याची घटना घडली. या प्रकरणी मायना कुडतरी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

दवर्ली येथील दत्त मंदिरातील वर्धापन दिनानिमित्त पालखी उत्सवाची तयारी केली जात होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास विद्युत रोषणाई करताना अनिकेत नाईक या युवकाला विजेचा धक्का बसला व तो जमिनीवर फेकला गेला. यानंतर त्याला उपस्थितांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर उपस्थितांकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अनिकेत नाईक हा युवक चांगला क्रिकेटर म्हणून ओळखला जात होता. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौरव नाईक करत आहेत. 

हेही वाचा