पणजी : गोवा पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार, पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्यासह १८ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. यात एक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक, पाच सहाय्यक उपनिरीक्षक, तीन हवालदार आणि आठ पोलीस काॅन्स्टेबल यांचा समावेश आहे.
याबाबतचा आदेश मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी जारी केला आहे.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांची गुन्हा शाखेत बदली करण्यात आली आहे. उपनिरीक्षक (मोटर वाहन विभाग) मोहन हळर्णकर यांची मोपा विमानतळ पोलीस स्थानकात, सहाय्यक उपनिरीक्षक संजय महाले यांची मडगाव वाहतूक विभाग, संदीप भोसले यांची गोवा राखीव दलात, रंजन मांद्रेकर यांची म्हापसा पोलीस स्थानकात, नरेंद साळगावकर यांची वास्को पोलीस स्थानकात, महिला सहाय्यक उपनिरीक्षक प्रचिता फळदेसाई यांची पणजी विशेष विभागात, हवालदार श्याम वेंगुर्लेकर कळंगुट वाहतूक विभाग, वैकंटरामेश मार्शाले गोवा राखीव दलात, अशोक गावस यांची मोपा विमानतळ पोलीस स्थानकात, कॉ. प्रकाश गावकर यांची म्हापसा पोलीस स्थानकात, प्रकाश पोळेकर यांची हणजूण पोलीस स्थानकात, अजित गावकर वाळपई पोलीस स्थानकात, अमोल नाईक यांची दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकात, हिरेश्वर भिट्टेवाडकर यांची वास्को पोलीस स्थानकात, राहूल मड्डीमनी यांची वेर्णा पोलीस स्थानकात, राजू दळवी आणि वर्षा देसाई यांची डिचोली पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे.