चिकन स्टीक्स

Story: चमचमीत रविवार |
6 hours ago
चिकन स्टीक्स

साहित्य - 

५०० ग्रॅम चिकन स्लाईस, १ टीस्पून गरम मसाला, १ कप क्रीम, ५ ते ६ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, १/२ टीस्पून लसूण पेस्ट, १ कप मक्याचे पीठ, १/२ टीस्पून जिरे पावडर, १/२ टीस्पून धणे पावडर, १/२ टीस्पून लाल मिरची पावडर, १/२ टीस्पून लिंबाचा रस, ब्रेड क्रंब्स किंवा प्लेन टोस्टची पावडर, मीठ चवीप्रमाणे. तेल आवश्यकतेनुसार तळण्यासाठी. 

 कृती  - 

जिरे, धनेपूड, तिखट, लसूण पेस्ट आणि कॉर्नफ्लोअर हे सर्व साहित्य एका लहान वाडग्यात एकत्रित करून घ्या. सर्व साहित्य चांगले एकजीव करा. एका मोठ्या वाडग्यात चिकनचे तुकडे टाका. नंतर त्यात वरील तयार मिश्रण घाला. नंतर त्यात थोडी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लिंबू रस घाला. सर्व साहित्य चांगले ढवळून घ्या. चिकनमध्ये क्रिम घाला आणि सर्व साहित्य परत एकदा चांगले ढवळून घ्या.

हे चिकनचे तुकडे ब्रेड क्रंब्समध्ये बुडवा. गॅसवर कढईत तेल तापत ठेवून तेल गरम झाल्यावर त्यात एक एक करून सोडा. हे चिकनचे तुकडे लालसर तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या आणि गरमागरम खा. सॉस किंवा पुदिना चटणी सोबत मस्त लागतात.


कविता आमोणकर