कर्नाटक : शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल पसरवली चुकीची माहिती; तेजस्वी सूर्यांविरोधात FIR

शेतकरी आत्महत्येचा संबंध वक्फ बोर्डाशी जोडल्याप्रकरणी भाजप खासदार तेजस्वी सूर्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन न्यूज पोर्टलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th November, 01:10 pm
कर्नाटक : शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल पसरवली चुकीची माहिती; तेजस्वी सूर्यांविरोधात FIR

बंगळुरू : कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी भाजप खासदार तेजस्वी सूर्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'शेतकऱ्याने आत्महत्या केली कारण त्यांची जमीन वक्फ बोर्डाने बळकावली होती' अशी भ्रामक पोस्ट सूर्या यांनी सोशल मीडियावर केली होती. दरम्यान सदर शेतकऱ्याच्या आत्महत्येमागे वित्तीय कारण असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

जानेवारी २०२२ मध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याने कर्ज आणि पिकांचे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असल्याचे हावेरीच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून अहवालही सादर केला होता. सूर्या यांच्या पोस्टनंतर कर्नाटकात खळबळ माजली असून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.  आहे. 

दरम्यान या प्रकरणी दोन कन्नड न्यूज पोर्टलच्या संपादकांविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हावेरीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येचा संबंध वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या वादाशी आहे, असा मथळा असलेली बातमी या पोर्टल्सवरुन प्रसिद्ध करण्यात आली होती. या चुकीच्या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये तणाव पसरू शकतो आणि त्यामुळेच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 'आतापासून आपण अशा माहितीच्या स्त्रोतांबाबत अधिक सतर्क राहणार आहोत, असे खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले. 

कर्नाटकातील वक्फ जमिनीच्या मुद्द्यावर तेजस्वी सूर्या आणि इतर नेत्यांच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना वक्फ जमिनीच्या नव्या नोटिसा देणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, भाजप खासदार जगदंबिका पाल यांनीही या मुद्द्यावरचा अहवाल हिवाळी अधिवेशनात संसदेत मांडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा