सरसांगण सुपर सीरिजच्या जर्सीचे अनावरण

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th November 2024, 12:27 am
सरसांगण सुपर सीरिजच्या जर्सीचे अनावरण

मडगाव : सारस्वत स्पोर्ट्स संघ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गोवा सरसांगण क्रिकेट स्पर्धेच्या ७ व्या आवृत्तीचे आयोजन रविवारी (दि. ३) आर्लेम क्रिकेट मैदानावर करण्यात आले. दरम्यान, यावेळी प्रमुख पाहुणे राजेश आमोणकर, सन्माननीय पाहुणे शिराज पै खोत, अॅड. सतीश पिळगावकर, राजेश कोळवालकर, दिनेश पै, आशेष पै दुकळे, दामोदर पै पारणेकर, दत्तप्रसाद सिलिमखान, अमोद बोरकर, रसिक पै खोत, परेश पडियार, संकेत सिंगबाळ, आदित्य तेंडुलकर, हर्षवर्धन आणि त्यांचा मुलगा वेद सिनाई भाटकुली यांच्या उपस्थितीत सरसांगण सुपर सीरिजच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.