मडगाव : कुंकळ्ळी आयडीसीमधील सनराईज इलेक्ट्रॉमेल्ट कंपनी परिसरात ट्रक मागे घेत असताना कामगार कुना भास्कर गौंडा (रा. ओडिशा) हा मागील चाकाखाली सापडला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सावधगिरी न बाळगल्याप्रकरणी चालक अल्लासाब तहसीलदार (रा. कर्नाटक) याच्यासह आणखी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सनराईज इलेक्ट्रॉमेड प्रा. लि. कंपनीत २५ ऑक्टोबर रोजी सदर घटना घडली होती . ट्रकचालक अल्लाहसाब तहसीलदार (रा. वेरोडा, मूळ कर्नाटक) हा आपला ट्रक चालवत मागे घेत असतानाच गाडीच्या मागील चाकाखाली कंपनीत कार्यरत कामगार कुणा भास्कर गौडा (सध्या रा. सनराईज इलेक्ट्रॉमेल्ट कंपनी व मूळ ओडिशा) हा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला. त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे . सध्या त्याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक अल्लाहसाब तहसीलदार याच्यासह गाडीला दिशा दाखवणार्या कंपनीतील अज्ञात इसमावर कुंकळ्ळी पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल मंगेश सातोडकर पुढील तपास करत आहेत.