बार्देश : हणजूणमध्ये घराला आग, २ लाखांचे नुकसान

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
31st October 2024, 09:46 pm
बार्देश : हणजूणमध्ये घराला आग, २ लाखांचे नुकसान

म्हापसा : गाववाडी, हणजूण येथे एका घराला आग लागून अंदाजे २  लाखांचे नुकसान झाले. मात्र  आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नाही. ही घटना बुधवारी मध्यरात्री ११.५३ च्या सुमारास गाववाडी येथील श्री भुमिका मंदिराजवळ असलेल्या घरात घडली. यावेळी सदर घरात कुणीही नव्हते. दोन पलंग , इन्व्हर्टर बॅटरी, भांडी, विद्युत उपकरणे, कपाट व इतर वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. 


घटनेची माहती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या नेतृत्वाखाली योगेश आमोणकर, रिचर्ड त्रीनिदाद, तुकाराम रेडकर व अक्षय सावंत या जवानांनी आग विझवली. अग्निशमन दलाचे आगीचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी वीज विभाग तसेच पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. घटनेचा पंचनामा हणजूण पोलिसांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा