कर्नाटक : विदेशात नोकरी देण्याचे गाजर दाखवून कारवारच्या दोघांची ३.४४ लाखांची फसवणूक

मडगावातील एकाविरुद्ध कारवारच्या पोलीस स्थानकात गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
01st November, 12:14 am
कर्नाटक : विदेशात नोकरी देण्याचे गाजर दाखवून कारवारच्या दोघांची ३.४४ लाखांची फसवणूक

कारवार : आजकाल नोकऱ्यांचे आमिष दाकगवून सामान्यांची फसवणूक करणाऱ्या ठकसेनांनी उच्छाद मांडला आहे. आता असाच प्रकार कारवार मधून उघडकीस आला आहे. विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून कारवारमधील दोघांना तब्बल ३ लाख ४४ हजारांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी मूळ कारवारचा पण सध्या पाजीफोंड मडगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या मॉन्टी क्रिस्टो गोन्साल्वीस याच्याविरुद्ध कारवारच्या सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. 

कारवारच्या हलगा येथील झेवियर जुझे डिसोजा यांनी ही तक्रार दिली आहे. गोंन्साल्वीस यांनी झेवियर यांचा मुलगा जॉनी डिसोजा आणि त्याचा मित्र अजय नाईक यांना विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. मात्र अद्याप कोणतीच नोकरी अद्याप मिळाली नाही. पैसे परत घेण्यासाठी गोन्साल्वीसशी संपर्क साधला असता, त्यांनी डिसोजा यांना धमकावले.याप्रकरणी पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.  









हेही वाचा