कोको गॉफने पटकावले चायना ओपनचे विजेतेपद

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
08th October, 12:06 am
कोको गॉफने पटकावले चायना ओपनचे विजेतेपद

बीजिंग : अमेरिकेच्या कोको गॉफने रविवारी उशिरा झालेल्या सामन्यात बीजिंग येथे महिला एकेरीच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत चायना ओपनचे विजेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या या अमेरिकन खेळाडूने अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या २८ वर्षीय कॅरोलिना मुचोवाचा ६-१, ६-३ असा पराभव केला. कोको गॉफने एक तास १७ मिनिटांत सामना जिंकला.
वीस वर्षीय कोको गॉफ गेल्या १४ वर्षात हे विजेतेपद पटकावणारी सर्वात तरुण खेळाडू तर ठरली आहेच, पण सेरेना विल्यम्स (२००४ आणि २०१३) नंतर येथे चॅम्पियन बनणारी दुसरी अमेरिकन खेळाडू देखील ठरली आहे. गॉफचे या मोसमातील हे दुसरे विजेतेपद आहे आणि कारकिर्दीतील हे ८ वे विजेतेपद आहे. या मोसमाच्या सुरुवातीला तिने ऑकलंडमधील एएसबी क्लासिक विजेतेपदाचा यशस्वी बचाव केला होता.

हेही वाचा