अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भवाळकर

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडून घोषणा


07th October, 12:03 am
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भवाळकर

न्यूज डेस्क। गाेवन वार्ता
पुणे : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांची घोषणा झाली. लोक संस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या तारा भवाळकर यांचे वय ८३ वर्षे आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी ही घोषणा केली.
संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी साहित्य महामंडळाने पुण्यात शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली. या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात झाली. बैठकीला महामंडळाचे पदाधिकारी तसेच साहित्य महामंडळाच्या घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तीन दिवसांचे कार्यक्रम, ग्रंथ दालन, ग्रंथ आदी विषयांवरही चर्चा झाली.